LPG सिलेंडरवर उगाच नसतात हे आकडे; जाणून घ्या याचा अर्थ
बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो. सिलिंडर घेताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबहुतांशी जण एलपीजी सिलिंडरचे वजन आणि सिलेंडर सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतात. परंतु, सिलेंडर घेण्याआधी विशिष्ट प्रकारचे कोड देखील तपासले पाहिजे.
गॅस सिलेंडरच्या वरच्या बाजूला एक विशेष कोड लिहिलेला असतो.
हा कोड अक्षरे आणि संख्या अशा दोन्ही स्वरूपात नमूद केलेला आहे. हा कोड सिलिंडरच्या एक्सपायरी डेटबद्दल सांगतो.
सिलिंडरवर लिहिलेले A, B, C आणि D म्हणजे वर्षाचे 12 महिने, तर हा सिलेंडर किती काळ वैध आहे हे क्रमांक सांगतो.
सिलेंडर वर्षाचे 12 महिने चार भागात विभागले आहेत. A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. तर B म्हणजे एप्रिल, मे आणि जून. C म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तसेच, D म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना.
उदाहरणार्थ, जर समजा एका सिलेंडरवर A 22 लिहिलेले असेल तर याचा अर्थ या सिलेंडरची जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये एक्सपायरी आहे. 22 म्हणजे 2022 मध्ये ही एक्सपायरी आहे.
एक्स्पायरी डेटनंतरही तुम्ही सिलिंडर वापरत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते
काही अनुचित प्रकार घडण्याचा धोका असू शकतो.
सिलेंडर घेताना हा कोड तपासला पाहिजे. यासोबतच सिलिंडरची चाचणी आणि वजनही तपासावे.