LIC Share : एलआयसीच्या शेअर दरात घसरण, सरकारने काय म्हटले?
एलआयसीच्या आयपीओला पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी आणि किरकोळ गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसादा दिला होता. मात्र, शेअर बाजारात एलआयसीच्या शेअरला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून एलआयसी शेअर दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आतापर्यंत गुंतवणुकदारांचे 1.51 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एलआयसीचे बाजार भांडवली मूल्य 4.48 लाख कोटी रुपये झाले आहे. एलआयसी कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून बाजार भांडवलात आतापर्यंत 1.51 लाख कोटींची घट झाली आहे.
एलआयसीच्या शेअर दरात होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
DIPAM चे सचिव तुहिनकांत पांडे यांनी सांगितले की, एलआयसीच्या शेअर दरात होत असलेली घसरण अस्थायी आहे. सरकारदेखील चिंतेत आहे. लोकांना एलआयसीचे फंडामेंटल्स समजण्यास वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एलआयसीचे व्यवस्थापन सर्व पैलूंवर लक्ष देणार असून शेअर धारकांना फायदा होईल असेही त्यांनी म्हटले. मार्च अखेरीस एलआयसीची असलेली एम्बेडेड वॅल्यू शेअर प्राइसची खरी किंमत दर्शवले. कंपनी आपली एम्बेडेड वॅल्यू जून महिन्याच्या अखेरपर्यंत अपडेट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.