IT Stocks Crash : तिकडे ट्रम्प यांच्याकडून H-1B च्या व्हिसा फीमध्ये वाढ, इकडे आयटी स्टॉक क्रॅश, एका दिवसात 1 लाख कोटी स्वाहा

IT Stocks: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एचवनबी व्हिसाच्या फीमध्ये वाढ केल्याचा फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसला आहे.

Continues below advertisement

आयटी कंपन्यांचे स्टॉक गडगडले

Continues below advertisement
1/6
भारताच्या आयटी कंपन्यांचं आज मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेच्या नव्या H-1B व्हिसा धोरणामुळं हा फटका आयटी कंपन्यांना बसला आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसाची फी 1 हजार डॉलर्सवरुन 1 लाख डॉलर्स केली आहे. यामुळं भारतीय आयटी कंपन्यांच्या स्टॉकमध्ये जोरदार विक्री पाहायला मिळाली. विक्री इतकी जोरदार होती की कंपन्यांचं बाजारमूल्य एका दिवसात 1 लाख कोटींनी घटलं.
2/6
आयटी कंपन्यांचं बाजारमूल्य 1 लाख कोटींनी घटलं यामध्ये सर्वाधिक फटका इन्फोसिस आणि टीसीएस कंपन्यांना बसला. अमेरिकेच्या H-1B व्हिसाची 88 हजारांवरुन 88 लाख रुपये झाली आहे. हा भारतीय आयटी कंपन्यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारणं आयटी कंपन्या H-1B व्हिसाद्वारे भारतीय आयटी प्रोफेशनल्सला अमेरिकेला घेऊन जात होती.
3/6
H-1B व्हिसाच्या अर्जाची फी वाढल्यानं कंपन्यांना स्थानिक अमेरिकन उमेदवारांची निवड करावी लागेल. यामुळं कंपन्यांचा वेतनावर होणारा खर्च वाढेल.यामुळं कंपन्यांच्या नफ्यावर देखील परिणाम होऊ शकत असल्यानं गुंतवणूकदारांकडून आयटी कंपन्यांच्या शेअरची विक्री केली.
4/6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका टीसीएस आणि इन्फोसिसला बसला. टीसीएस आणि इन्फोसिस या दोन कंपन्यांचं बाजारमूल्य 51000 कोटींनी घटलं. टीसीएसचं बाजारमूल्य 35000 कोटी आणि इन्फोसिसंचं बाजारमूल्य 17000 कोटींनी घटलं.
5/6
LTI Mindtree कंपनीचं बाजारमूल्य 7300 कोटी, एचसीएल टेक 7500 कोटी, विप्रोचं बाजारमूल्य 5850 कोटी, टेक महिंद्रा 4500 कोटी, पर्सिस्टंट सिस्टीम्स 3700 कोटी, Mphasis चं बाजारमूल्य 2750 कोटी, Cofrge चं बाजारमूल्य 2583 कोटी रुपयानी घटलं. याचवेळी मिडकॅप आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola