पुन्हा एकदा मोठा आयपीओ आला! GMP वर शेअर तेजीत, जाणून घ्या किंमत पट्टा काय?
Onyx Biotec IPO : पुढच्या आठवड्यात एका दमदार कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता आहे. या कंपनीचे नाव ओनिक्स बायोटेक लिमिटेड (Onyx Biotec IPO) असे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओनिक्स बायोटेक लिमिटेड या कंपनीच्या आयपीओत 13 नोव्हेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येईल.
या आयपीओचा किंमत पट्टा 61 रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आलेला आहे.
सध्या हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 5 रुपयांच्या प्रमियमवर आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग 9 टक्क्यांच्या प्रीमियमवर होऊ शकते.
या आयपीओत एकूण 48.10 लाख शेअर्स हे फ्रेश इश्यूच्या माध्यमातून विकण्यात येतील. ओनिक्स बायोटेक लिमिटेड ही कंपनी औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.
या कंपनीचा आयपीओ 29.34 कोटी रुपयांचा आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)