IPO Update :HDB फायनान्शिअल सर्व्हिसेसचा आयपीओ जुलै नव्हे जूनमध्येच येण्याची शक्यता, 12500 कोटींची उभारणी, HDFC बँकेच्या शेअरमध्ये तेजी

HDB Financial Services IPO : या कंपनीचा आयपीओ लवकरच येण्याची शक्यता आहे. एचडीएफसी बँकेची या कंपनीत 94.3 टक्के भागीदारी आहे.

एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस

1/7
एचडीएफसी बँकेची सहायक कंपनी एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेचचा आयपीओ जुलै नव्हे जून महिन्यात येण्याची शक्यता आहे. या आयपीओच्या माध्यमातून 12500 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार आहे. मनीकंट्रोलच्या बातमीनुसार सेबीकडे UDRHP दाखल करण्यात आलं आहे. यानंतर काही दिवसात रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस जमा केलं जाईल. त्यानंतर 24 जूनला अँकरचा हिस्सा जमा केला जाईल. हा आयपीओ 25 जून ते 27 जून दरम्यान येऊ शकतो.
2/7
शेअर बाजारात काही बदल झाले तर लाँचिंगची तारीख बदलली जाऊ शकते. एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या आयपीओद्वारे 2500 कोटी रुपयांचे नवे शेअर जारी केले जातील. एचडीएफसी बँक 10 हजार कोटी रुपयांचे शेअर ऑफर फॉर सेल द्वारे विक्री केले जातील.
3/7
एचडीएफसी बँकेकडे या कंपनीची 94.3 टक्के भागीदारी आहे. एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसनं ऑक्टोबर 2024 मध्ये सेबीकडे डीआरएपची दाखल केला होता. त्याला जूनमध्ये मंजुरी मिळाली आहे.
4/7
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ऑक्टोबर 2022 मध्ये जारी केलेल्या आदेशामुळं अप्पर लेअर नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनी म्हणून नोटिफाय केल्यानंतर सप्टेंबर 2025 पूर्वी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणं अपेक्षित आहे.
5/7
आयपीओद्वारे 2500 कोटी रुपयांचे नवे शेअर जारी केले जाणार आहेत. आयपीओतून उभ्या होणाऱ्या रकमेचा वापर टिअर -1 कॅपिटल बेस ला मजबूत करण्यासाठी केला जाणार आहे. ही कंपनी 1680 शाखांच्या माध्यमातून काम करते. ही कंपनी वाहन कर्ज आणि मालमत्ता कर्जाचं वितरण करते.
6/7
एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये 16 जूनला बीएसईवर 1 टक्क्यांची तेजी आली आहे.आज हा स्टॉक 1935.05 रुपयांवर पोहोचला. बँकेचं बाजारमूल्य 14.8 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या तीन महिन्यात स्टॉक 13 टक्क्यांनी वाढला आहे. 100 टक्के भागीदारी पब्लिक शेअर होल्डर्सच्या जवळ आहे.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola