Standard Glass Lining IPO: गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Standard Glass Lining Technology IPO : स्पेशल इंजिनिअरिंग इक्विपमेंट बनवणाऱ्या स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ 6 जानेवारीला खुला झाला होता. आज हा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी बंद होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीनं 410.05 कोटींच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. यामध्ये 210 कोटी रुपयांचे 1.50 कोटी शेअर नव्यानं जारी केले जातील. तर 200.05 कोटी रुपयांचे शेअर 1.43 कोटी शेअर ऑफर फॉर सेलद्वारे विकले जातील. आयपीओनं किंमतपट्टा 133-140 रुपये निश्चत केला आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 107 शेअर आहेत.
स्टँडर्ड ग्लास लायनिंगच्या आयपीओला दुसऱ्या दिवसअखेर 34 पट सबस्क्राइब करण्यात आलं आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 4.68 पट, एनआयआयकडून 76.65 पट तर रिटेल गुंतवणूकदारांनी 32.40 पट आयपीओ सबस्क्राइब केला आहे.
स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजी ही कंपनी 2012 मध्ये स्थापन झाली होती. हैदराबाद येथील ही कंपनी फार्मास्यूटिकल आणि केमिकल क्षेत्रातील अभियांत्रिकी उपकरणांची उत्पादक आहे. या आयपीओचा जीएमपी 68 टक्क्यांवर पोहोचला आहे. या नुसार आयपीओ लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना प्रतिशेअर 90-95 रुपये परतावा मिळू शकतो.
दरम्यान, स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीसह क्वाडरंट फ्यूचर टेक आणि कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट हे दोन आयपीओ देखील बोली लावण्यासाठी खुले आहेत. स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ 13 जानेवारीला शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)