IPO Update : एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तगडा प्रतिसाद, 89 पट सबस्क्राइब,GMP किती?
एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओच्या लॉटसाठी बोली लावण्याची मुदत आज संपली. एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओला 89.90 पट सब्रस्क्राइब करण्यात आलं आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 101 शेअर आहेत, एका शेअरचं मूल्य किमान 140 रुपये ते 148 रुपये असं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील आकडेवारीनुसार एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओद्वारे 3,07,93,600 शेअर जारी केले जाणार आहेत. मात्र, 2,76,83,13,747 शेअरसाठी बोली लागली आहे. इनवेस्टरगेनच्या अंदाजानुसार जीएमपी प्रति शेअर 196 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गुंतवणूकदारांना जीएमपीनुसार आयपीओ लिस्टींग झाल्यास 32 टक्के परतावा मिळू शकतो.
पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून या आयपीओला 157.05 पट सबस्क्राइब करण्यात अलं आहे. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून देखील 153.80 पट बोली लावण्यात आली आहे. रिटेल गुंतवणूकदारांकडून 24.48 पट सब्सक्राइब करण्यात आलं आहे. एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीनं अँकर इनवेस्टर्सकडून 195 कोटी रुपये उभारले आहेत. आयपीओच्या माध्यमातून 650 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न आहे.
कंपनीनं आयपीओद्वारे 3 कोटी 87 लाख इ्क्विटी शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रवर्तकांकून 52.68 लाख शेअरच्या विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीनं आयपीओद्वारे 3 कोटी 87 लाख इ्क्विटी शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रवर्तकांकून 52.68 लाख शेअरच्या विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.