IPO Drops : 2025 मध्ये आयपीओचं वारं ओसरलं, IPO लिस्टींगमध्ये 60 टक्क्यांनी घट,आकडेवारी समोर
IPO Drops : 2024 मध्ये भारतीय शेअर बाजारात लिस्ट झालेल्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना चागंला परतावा दिला होता. यंदा मात्र, वेगळं चित्र पाहायला मिळत आहे.
आयपीओ अपडेट
1/7
आयपीओ मार्केटमध्ये 62 टक्के झाल्याचं प्रमुख कारण जागतिक आणि देशांतर्गत घटक हे आहेत. या घटकांचा परिणाम आयपीओ मार्केटवर झाला आहे.
2/7
2025 मध्ये आलेल्या 10 आयपीओच्या माध्यमातून 18704 कोटी रुपयांची उभारणी करण्यात आली. या तुलनेत 2024 मध्ये जानेवारी ते मे या कालावधीत 27 आयपीओंच्या माध्यमातून 24437 कोटी रुपयांची उभारणी करण्यात आली होती.
3/7
आयपीओंची संख्या जरी घटलेली असली तरी आयपीओंची सरासरी इशू साईज व वाढलेली आहे. ती 905 कोटी रुपयांवरुन 1870 कोटींवर गेली आहे. 2025 मध्ये हेक्झावेअर टेकचा आयपीओ 8750 कोटी, डॉ. अग्रवाल हेल्थ केअर 3027 कोटी, एथर एनर्जी आयपीओ 2981 कोटी रुपयांचा होता.
4/7
2025 मध्ये लिस्ट झालेल्या आयपीओंना अडचणींचा सामना करावा लागला. 10 पैकी 6 आयपीओंचे स्टॉक्स इशू प्राईस पेक्षा खाली ट्रेड करत आहेत. एथर एनर्जी आणि क्वालिटी पॉवरचा यात समावेश आहे. इंडो फार्म आणि स्टॅलिऑन इंडियाच्या शेअरमध्ये 38 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे.
5/7
रिटेल आणि संस्थात्मक गुंतवणूकदार सावधपणे पावलं उचलत असल्यानं सेबीकडून परवानगी मिळून देखील अनेक कंपन्यांनी आयपीओ आणलेले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील धोरणाबाबतची अनिश्चितता, जगभरातील युद्धजन्य परिस्थिती, भारत पाकिस्तानमधील संघर्ष याचा परिणाम देखील आयपीओच्या लिस्टिंगवर झाल्याचं दिसून येतं.
6/7
सेबीकडे साधारणपणे 80 कंपन्यांनी आयपीओसाठी डीआरएचपी पेपर जमा केले आहेत. त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक कंपन्यांना आयपीओसाठी सेबीकडून परवानगी मिळाली असून देखील त्यांनी आयपीओ आणलेले नाहीत. 2024 मध्ये आयपीओमध्ये देशातंर्गत गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली होती.
7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 14 May 2025 10:19 PM (IST)