मोठी बातमी! आयफोन 15 वर बम्पर सूट, महागडा फोन स्वस्तात मिळणार, 70 हजार नव्हे तर फक्त 'इतके' रुपये लागणार
आपल्याकडे आयफोन असावा असे प्रत्येकालाच वाटते. मात्र अॅपल कंपनीचे फोन फारच महागडे असल्यामुळे सामान्य व्यक्ती हे फोन घेऊ शकत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र आता आयफोन घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर आयफोनवर बम्पर सूट देण्यात आलेली आहे.
अॅपल कंपनीच्या संकेतस्थवरील माहितीनुसार आयफोन-15 या फोनची किंमत 69900 रुपये तसेच म्हणजेच जवळपास 70 हजार रुपये तर आयफोन -15 प्लस फोनची किंमत तब्बल 79900 रुपये म्हणजेच जवळपास 80 हजार रुपये आहे.
मात्र फ्लिकपार्टवर आयफोन-15 हा फोन फक्त 58499 रुपयांना मिळतोय. म्हणजेच या फोनवर तब्बल 11401 रुपयांची सूट देण्यात आली आहे.
आयफोन 15 प्लस हे मॉडेलही अवघ्या 69999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच आयफोन 15 प्लस या मॉडेलवर फ्लिकपार्टवर तब्बल 15901 रुपयांची सूट देण्यात येत आहे.