Investment Idea : SIP द्वारे 3 कोटींचा फंड कसा उभा करायचा? किती वर्ष अन् किती रुपयांची गुंतवणूक करायची?

SIP : जर तुम्हाला एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करुन 3 कोटी रुपयांचा निधी उभा करायचा असेल तर तो कसा करायचा हे जाणून घेणार आहोत.

Continues below advertisement

एसआयपी

Continues below advertisement
1/5
एसआयपी हा गुंतवणुकीचा प्रकार अलीकडच्या काळात लोकप्रिय झाला आहे. एसआयपीद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक करुन तुम्ही मोठी रक्कम उभी करु शकता. एसआयपीद्वारे दरमहा गुंतवणूक करता येते किंवा लम्पसम गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील आहे. जर तुमच्याकडे 30 लाख रुपये असतील तुम्हाला मोठा फंड उभा करायचा असेल तर तुम्ही मुच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करु शकता. गुंतवणुकीच्या इतर पर्यांचा विचार देखील करु शकता.
2/5
जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एका वेळी 30 लाख रुपयांची गुंतवणूक लम्पसम म्हणून केलीत तर 12 टक्के सीएजीआरनुसार 11 वर्षात 1 कोटी रुपयांचा निधी जमा होईल. यामध्ये 11 वर्षात जवळपास 74 लाखांचा भांडवली नफा मिळेल. तुमची रक्कम 1 कोटी 4 लाख इतकी होईल.
3/5
जर तुम्ही 1 कोटींच्या पुढचा विचार करत असाल आणि 2 कोटींच्या फंडाचा विचार करत आहात तर तुम्हाला 30 लाखांच्या गुंतवणुकीवर 17 वर्ष थांबाव लागेल. ज्यामुळं तुमचा फंड 2 कोटी 6 लाख रुपये होईल. 17 वर्षात तुम्हाला 1 कोटी 76 लाख रुपये भांडवली नफा होईल.
4/5
30 लाख रुपयांच्या लम्पसम गुंतवणुकीवर 3 कोटींचा फंड निर्माण होण्यासाठी 21 वर्ष थांबावं लागेल. 21 वर्षानंतर तुमची रक्कम 3 कोटी 24 लाख रुपये झालेली असेल. भांडवली नफा 2 कोटी 94 लाख रुपये असेल. म्हणजेच तुमचा नफा तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेच्या 9 पट असेल. ही आकडेवारी 12 टक्के सीएजीआर नुसार आहे.
5/5
वरील सर्व आकडेवारी 12 टक्के प्रति वार्षिक सीएजीआर नुसार काढलेली आहे. बाजारातून यापेक्षा अधिक दरानं रिटर्न मिळाले तर या रकमेत फरक पाहायला मिळेल. बाजारातून मिळणाऱ्या रिटर्नचा दर 12 टक्के सीएजीआर पेक्षा कमी असेल तर अधिका काळ वाट पाहावी लागू शकते. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola