Instagram Earning : 1000 Views ला इन्स्टाग्रामकडून किती पैसे मिळतात? जाणून घ्या क्रिएटर्स कशी कमाई करतात?

इन्स्टाग्रामवर 1000 व्यूज साठी किती रक्कम मिळेल यासंदर्भात फिक्स्ड पेमेंट सिस्टीम नाही. व्यूजमुळं तुमचा रीच वाढतो.मात्र, कमाई फॉलोअर्सची संख्या, एंगेजमेंट आणि कंटेंटच्या कमाईवर ठरते.

इन्स्टाग्राम वरुन पैसे कसे मिळतात?

1/7
इन्स्टाग्राम सध्या सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इन्स्टाग्रामच्या रील्स फीचरनं तर कमाल केली आहे. छोटे-छोटे व्हिडिओज करुन लोकप्रिय होत आहेत. इन्स्टाग्रामवर 1000 व्यूज साठी किती पैसे मिळतात हे अनेकांना माहिती नसतं.
2/7
अनेकांना वाटतं की व्यूज आल्यानंतर इन्स्टाग्राम थेट पैसे ट्रान्सफर करतं. यूट्यूबप्रमाणं इन्स्टाग्रामवरुन व्यूजसाठी पैसे मिळत नाहीत. ब्रँड डील्स आणि स्पॉन्सरशिप आणि दुसऱ्या पद्धतींद्वारे इन्स्टाग्रामवरुन कमाई होते.
3/7
इन्स्टाग्रामवरुन पैशांची कमाई करण्यासाठी फक्त व्यूज नाही तर एंगेजमेंट (लाइक्स, कमेंटस, शेअर), फॉलोअर्स आणि कंटेटची क्वालिटी देखील महत्त्वाची असते.
4/7
जेव्हा तुमचे फॉलोअर्स 10 हजारांपेक्षा अधिक असतात तेव्हा ब्रँडस तुमच्याशी संपर्क करु लागतात. जर कंटेंट यूनिक आणि एंगेजिंग असेल तर कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या प्रमोशनसाठी तुमच्याशी संपर्क करतील आणि पैसे देतील.
5/7
याशिवाय रिल्सवर एंगेजमेंट (लाइक्स, कमेंटस, शेअर) येत असेल म्हणजेच लोक तुमचे रिल्स शेअर करत असतील, सेव्ह करत असतील तर कंपन्या ब्रँड प्रमोशनसाठी संपर्क साधू शकतात. कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या प्रमोशनसाठी रिल्सला प्रत्येक 500 रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत पैसे देऊ शकते.
6/7
सरासरी 1000 व्यूज साठी 100 ते 200 रुपये मिळू शकतात. मात्र, मोठ्या क्रिएटर्ससाठी ही रक्कम मोठी असू शकते. एंगेजमेंट रेट यासाठी महत्त्वाचा असतो. लाइक्स, कमेंटस, शेअर जादा असतील तर ब्रँड जादा पैसे देतात.
7/7
ब्रँडेड कंटेंटसाठी कंपन्या क्रिएटर्सला उत्पादन प्रमोट करण्यासाठी पैसे देऊ शकतात. मायक्रो- इन्फ्लूएन्सर (1,000-10,000 फॉलोअर्स) 5,000 ते 20,000 रुपये प्रति पोस्ट कमवू शकतात. जर 1000 व्यूज साठीच्या रील वर ब्रँड डील होत असेल तर 10000 रुपये सहजपणे मिळू शकतात.
Sponsored Links by Taboola