Tatkal Ticket काही सेकंदातच कसे संपतात? नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
Tatkal Ticket : तत्काळ बुकिंगसाठी गेल्यावर हमखास कन्फर्म तिकीट मिळत नाही. बुकिंग सुरू होताच काही सेकंदांत सगळी तिकिटं संपून जातात. असं नेमकं काय होतं जाणून घ्या सविस्तर...
Continues below advertisement
Tatkal Ticket
Continues below advertisement
1/7
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी ट्रेनचा प्रवास केला असेलच. ट्रेनचा प्रवास हा खूप सोयीस्कर आणि आरामदायक असतो. ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दोन प्रकारचे डबे असतात. एक आरक्षित आणि दुसरे अनारक्षित होय.
2/7
अनारक्षित डब्यात जनरल कोच असतो, ज्यामध्ये प्रवासी सामान्य जनरल तिकीट घेऊन प्रवास करू शकतात. या डब्यात कोणत्याही प्रवाशाच्या नावावर सीट आरक्षित केलेली नसते. कोणताही प्रवासी जिथे जागा मिळेल तिथे बसू शकतो.
3/7
आरक्षित कोचबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये स्लीपर आणि एसी कोच असतात. ज्यामध्ये बुकिंग केल्यानंतर प्रवाशांना ठराविक कोचमध्ये विशिष्ट सीट नंबरसह जागा दिली जाते. यामध्ये प्रवासापूर्वीच आरक्षण करणे आवश्यक असते.
4/7
अनेक वेळा लोकांना काही विशिष्ट मार्गावर जाण्यासाठी आरक्षित तिकीट मिळत नाही. अशा परिस्थितीत लोक तत्काळ बुकिंगचा आधार घेतात. पण तत्काळ बुकिंग सुरू होताच काही सेकंदातच सर्व तिकिटं संपून जातात. अखेर असं का होतं?
5/7
खरं तर, तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी तिकीट इतक्या लवकर संपतात कारण त्या वेळी तिकिटांची मागणी खूप जास्त असते आणि तिकीटांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे जेव्हा अनेक लोक एकाच वेळी बुकिंग करायला सुरुवात करतात, तेव्हा तिकीट काही क्षणातच संपून जातात.
Continues below advertisement
6/7
एकूणच सांगायचं झालं, तर तत्काळ बुकिंग "पहिले या, पहिले मिळवा" या तत्त्वावर चालते. जर तुम्ही लॉगिन करण्यात उशीर केला, तर कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता फारच कमी होते. त्यामुळे शक्यतो तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या दोन-तीन मिनिटांपूर्वीच लॉगिन करून तयार राहा.
7/7
आता भारतीय रेल्वेने तत्काळ बुकिंगसाठी एक नवीन नियम लागू केला आहे. ज्यामध्ये ज्या आयआरसीटीसी खात्यांमध्ये आधार लिंक केलेले असेल, अशा खात्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटसाठी 10 मिनिटांपर्यंत तत्काळ बुकिंग खुली राहणार नाही.
Published at : 07 Jun 2025 01:43 PM (IST)