Railway Ticket : रेल्वेच्या तिकीटावरील सीट क्रमांकामधील CNF, RLWL या शब्दाचा अर्थ काय असतो?
भारतीय रेल्वे जगातील सर्वोत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. जर तुम्हाला रेल्वेनं प्रवास करायचा असेल तर रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचं आरक्षण करावं लागतं. तुम्ही जेव्हा आरक्षण करता त्यावेळी तुम्हाला रेल्वेकडून तिकीट जारी केलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेल्वे तिकिटावर पीएनआर असतो त्याच प्रमाणं कोणती सीट आरक्षित झालीय त्याबद्दल देखील माहिती असते.
तुमच्या सीट क्रमांकापुढं CNF असा उल्लेख असेल तर तुम्हाला ट्रेनमध्ये सीट मिळाली आहे असा अर्थ होतो. CNF चा अर्थ कन्फर्म असा असतो. म्हणजेच तुम्ही आरक्षित करत असलेलं तिकीट निश्चित झालं असून तुम्हाला ट्रेनमधील सीट दिली जाते.
काही जणांना तिकीट आरक्षित केल्यानंतर कन्फर्म सीट मिळत नाही. सीट क्रमांकापुढं RLWL असा उल्लेख असतो. त्याचा अर्थ रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट असा होतो. म्हणजेच गाडी जिथून सुटते त्या स्टेशनपासून बुकिंग न करता दुसऱ्या स्टेशनवरुन प्रतीक्षा यादीतील तिकीट बुक केल्यास त्या वेटिंग लिस्टचा उल्लेख RLWL असा केला जातो.
रिझर्व्हेशन अगेंस्ट कॅन्सलेशन असा देखील उल्लेख असतो. तुम्हाला RAC तिकीट मिळाल्यास त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अर्धी सीट उपलब्ध होते. त्या सीट नंबर आणखी एक प्रवासी प्रवास करु शकतो.