Railway Rules: रेल्वे आरक्षण चार्ट आता 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार

Indian Railway Rules: भारतीय रेल्वे आरक्षण चार्ट संबंधित ट्रेन निघण्यापूर्वी 24 तास अगोदर जारी करणार आहे. यापूर्वी चार्ट 4 तास अगोदर तयार केला जायचा.

Continues below advertisement

रेल्वे तिकीट आरक्षण नियम

Continues below advertisement
1/6
भारतीय रेल्वेकडून सध्या एखादी एक्स्प्रेस निघण्यापूर्वी चार तास अगोदर आरक्षण चार्ट तयार केला जातो. रेल्वेचं तिकीट कन्फर्म झालं की नाही ते 4 तास अगोदर समजतं. आता या नियमामध्ये बदल केला जाणार आहे.
2/6
आता रेल्वेकडून आरक्षण चार्ट 24 तास अगोदर तयार केला जाणार आहे. त्यामुळं तुमचं तिकीट वेटिंगवर असेल तर अखेरपर्यंत तिकीट कन्फर्म झाले की नाही याची वाट पाहण्याची गरज राहणार नाही.
3/6
नव्या पद्धतीत प्रवाशांना त्यांचं तिकीट कन्फर्म झालं की नाही याची माहिती 24 तास अगोदर समजेल.यामुळं तिकीट कन्फर्म न झाल्यास ते रद्द करुन पर्यायी व्यवस्था करा येऊ शकते. तिकिट रद्द करुन रिफंडची प्रक्रिया सुरु करता येईल.
4/6
रेल्वेच्या सध्याच्या नियमानुसार ट्रेन सुटण्यापूर्वी 48 ते 12 तासांच्या काळात तिकीट रद्द केल्यास 25 टक्के रक्कम कपात केली जाते. ट्रेन निघण्यापूर्वी 12 ते 4 तास तिकीट रद्द केल्यास अधिक रक्कम कापली जाते.
5/6
ट्रेनचा आरक्षण चार्ट तयार केल्यानंतर तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळत नाहीत. नव्या नियमानंतर तिकीट रद्द करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेळ मिळेल. प्रवासी त्यांच्या प्रवासासाठी वेगळी व्यवस्था करु शकतात.
Continues below advertisement
6/6
सध्या 24 तास आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया केवळ एका स्टेशनवर प्रायोगिक पातळीवर सुरु करण्यात आली आहे.हे यशस्वी झाल्यास रेल्वेला रिफंड धोरणात बदल करावा लागेल.
Sponsored Links by Taboola