इतर देशांच्या तुलनेत भारतात इंटरनेट खूपच स्लो; जगात कितवा क्रमांक?
भारतात एकीकडे 5 जी इंटरनेटची (5G Internet) उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App5 जी इंटरनेटमुळे देशातील मोबाइल इंटरनेटमध्ये (Mobile Internet) क्रांती येईल असे दावे केले जात आहेत.
दुसऱ्या बाजूला भारतात सध्या वापरात असलेल्या इंटरनेटचा वेग कमालीचा मंदावला असल्याचे समोर आले आहे.
वेगवान इंटरनेट असणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या 100 देशांतही भारताचा (Internet Speed In India) समावेश नाही.
भारतात इंटरनेटचा स्पीड इतर देशांच्या तुलनेत मंदावत असल्याचे समोर आले आहे.
ग्लोबल स्पीड टेस्ट एजन्सी Ookla ने इंटरनेट स्पीडबाबत एक अहवाल जारी केला आहे.
ग्लोबल इंटरनेट स्पीडच्या यादीत ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारताची पिछेहाट झाली आहे. ब्रॉडब्रॅण्ड आणि मोबाइल इंटरनेट या दोन्हीच्या वेगात भारताची घसरण झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात ब्रॉडब्रॅण्ड वेगाबाबत भारत 117 व्या स्थानाहून 118 व्या स्थानावर आला आहे.
मोबाइल इंटरनेट स्पीडबाबत भारत 78 व्या स्थानावरून 79 व्या स्थानावर आला आहे.
ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारतातील मोबाइल डाउनलोड स्पीड चांगला झाला आहे. ऑगस्ट महिन्यात मोबाइल डाउनलोड स्पीड 13.52Mbps इतका होता. सप्टेंबर महिन्यात यात वाढ होऊन तो 13.87Mbps इतका झाला.
इंटरनेट स्पीडच्या बाबतीत नॉर्वे देश पहिल्या स्थानावर आहे. मोबाइल इंटरनेटचा स्पीड नॉर्वेमध्ये सर्वाधिक आहे.