Smartphone : स्मार्टफोन चोरीला गेल्यानंतर आधी 'हे' काम करा, नाही तर होईल मोठे नुकसान

स्मार्टफोनमुळे आपली बरीच कामे सोपी झाली आहेत. खरेदीपासून ते बँकिंग व्यवहारासाठी आता बँकेतही जावे लागत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्मार्टफोन चोरी झाल्यास तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता.

सायबर गुन्हेगारीचे वाढता प्रमाण पाहता फोन चोरी झाल्यानंतर तातडीने आवश्यक पावले उचलावीत.
स्मार्टफोन चोरी झाल्यानंतर तुम्ही आधी तातडीने तुमचा मोबाइल फोन सीम कार्ड ब्लॉक करावा. त्यामुळे त्या क्रमांकावर फोन कॉल अथवा मेसेज मिळणार नाही.
तुम्ही बँकिंग अॅप वापरत असाल तर तेदेखील ब्लॉक करावे. त्यासाठी बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा.
त्याशिवाय, तुम्ही तातडीने इंटरनेट बँकिंग देखील बंद करण्यासाठी कस्टमर केअरला विनंती करू शकता.
तुम्ही युपीआय अॅप वापरत असाल तर पेटीएम, फोन पे आदी ब्लॉक करावेत. त्यामुळे त्याद्वारे होणारे व्यवहार होणार नाहीत.
शक्य झाल्यास आधारशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक बदलावा. त्यासाठी नजीकच्या आधार केंद्रात जाऊन नोंदणीकृत असलेला मोबाइल क्रमांक ब्लॉक करावा.