Financial detox : सणानंतर रिकामा झालेला खिसा पुन्हा भरायचा आहे का? जाणून घ्या हे स्मार्ट टिप्स...
Financial Detox: सणांनंतर जेव्हा आपण आपले बँक स्टेटमेंट पाहतो, तेव्हा आपल्याला अनेकदा लक्षात येते की आपण सणासुदीच्या काळात खूप खर्च केला आहे. पण आता आपले आर्थिक स्थिती सुधारण्याची वेळ आली आहे.
Continues below advertisement
Financial detox
Continues below advertisement
1/7
सणांच्या काळात आपण खरेदी, जेवण, भेटवस्तूंपासून ते प्रवासापर्यंत सर्व गोष्टींवर भरपूर खर्च करतो, पण आता उत्सव संपले आहेत, तेव्हा आपल्याला जाणवते की आमचा बँक बॅलन्स खूपच कमी झाला आहे.
2/7
सगळ्यात पहिले, तुमच्या सगळ्या झालेल्या खर्चांची एक यादी बनवा आणि त्यांना आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्चांमध्ये विभागा.
3/7
तुमच्या क्रेडिट कार्डच्या वापरावर ताबा ठेवा; पुढील 2-3 महिन्यांसाठी क्रेडिट कार्डऐवजी डेबिट किंवा कॅशचा वापर करा.
4/7
पुढच्या 7 दिवसांत फक्त आवश्यक खर्च करा. याने तुमचे फक्त पैसेच वाचत नाहीत तर पैसे खर्च करण्याची सवय सुद्धा मोडते.
5/7
नवीन महिन्याचे बजेट बनवा ;त्यात आवश्यक खर्चासाठी उत्पन्नाचे 50%, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी 30%, अनावश्यक खर्चासाठी 20% द्या.
Continues below advertisement
6/7
सणांच्या काळात तुमच्या बचतीत काही घट झाली असेल, तर ती आधी भरून काढा.
7/7
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 30 Oct 2025 03:51 PM (IST)