पोस्टात FD करायचीये? घरबसल्याच होईल काम; खातं खोलण्यासाठी फक्त 'हे' करा!
Post Office FD : पोस्ट ऑफिस बँकेत एफडी करण्याची सुविधा आहे. त्यासाठी खाले खोलावयाचे असेल तर घरबसल्या तुम्ही हे खाते खोलू शकता.
Continues below advertisement
POST OFFICE FD ACCOUNT (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
Continues below advertisement
1/7
पोस ऑफिस विभागामार्फत आरडी, एफडी, पीपीएफ अशा वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. एफडी करायची असेल आणि त्यासाठी तुम्हाला खाते खोलायचे असेल तर कुठेही जाण्याची गरज नाही. घरी बसून तुम्ही खाते खोलू शकता. त्यासाठी काय करावे लागेल, हे समजून घेऊ या...
2/7
इंट्रा ऑपरेबल नेटबँकिंग/ मोबाईल बँकिंग या माध्यमातून तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट अकाउंट खोलू शकता.
3/7
त्यासाठी तुम्हाला युजर आयडी, पासवर्डच्या माध्यमातून https://ebanking.indiapost.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करावे.
4/7
त्यानंतर 'जनरल सर्व्हिेस' या ऑप्शनवार जावे. त्यानंतर 'सर्व्हिस्ट रिक्वेस्ट' या ऑप्शनवर जाऊन क्लिक करा
5/7
त्यानंतर 'न्यू रिक्वेस्ट' या ऑप्शनवर जाऊन टाइम डिपॉजिट अकाउंट खोलण्यासाठी अर्ज करा
Continues below advertisement
6/7
हे खातं खोलण्यासाठी तुम्हाला अॅक्टिव्ह सेव्हिंग अकाउंट, पॅन कार्ड, केवाईसी डॉक्यूमेंट्स, अॅक्टिव्ह, DOP ATM, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी डॉक्यूमेंट्स अपलोड करावे लागतील.
7/7
अर्ज भरण्यासाठी तुम्हाला संपूर्ण अर्जप्रकियेचे पालन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर तुमचे पोस्ट ऑफिस टाईन डिपॉझिट अकाऊंट चालू होईल.
Published at : 06 Dec 2024 03:15 PM (IST)