'असं' करा आधार मोफत अपडेट; जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!
Free online Aadhaar Update Deadline: आधार मोफत अपडेट करण्यासासाठी आजचा शेवटचा दिवस होता. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. आता 14 डिसेंबरपर्यंत आधार मोफत अपडेट करता येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUIDAI च्या म्हणण्यानुसार पत्ता, फोन नंबर, नाव, ईमेल आयडी इत्यादी माहिती तुम्ही मोफत अपडेट करू शकता.
फोटो अपडेट करणे, बायोमॅट्रिक, डोळे याबाबतची माहिती तुम्हाला अपडेट करायची असेल तर हे काम तुम्हाला ऑनलाईन करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला आधार क्रेंद्रावरच जावे लागेल.
आधार कार्ड मोफत अपडेट करायचे असेल तर https://uidai.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
त्यानंतर लॉगईन करा. लॉगईन करण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक तसेच रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकावा लागेल.
लॉगईन केल्यानंतर आधार अपडेट हा पर्याय निवडावा. त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाईल दिसेल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारवरील जी माहिती अपडेट करायची असेल तो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये जाऊन 'I verify that the above details are correct' या ऑप्शनवर जाऊन क्लीक करा. त्यानंतर चेकबॉक्सवर टीक करून सबमीट करा.
आधार अपडेट करताना त्यासंबंधीचे कागपत्रे तुम्हाला मागितले जातील. ते अपलोड करावेत.
अपडेट रिक्वेस्ट स्वीकारली गेल्यानंतर तुमचा एक 14 अंकी URN नंबर जनरेट होईल.
या क्रमांकाला सेव्ह करून ठेवा. त्यानंतर काही दिवसांनंतर तुमचे आधार अपडेट होईल.