Masked Aadhar Download : केंद्र सरकारचे आवाहन, Masked Aadhar चा वापर करा; असं करता येईल डाउनलोड
केंद्र सरकारने आधार कार्ड बाबत महत्त्वाचे आदेश काढले आहेत. या नव्या सुचनेनुसार आधार कार्डची झेरॉक्स कुठेही जमा न करण्यास सरकारने म्हटले आहे. आधार कार्डचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकारने हे आदेश काढले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएखाद्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स अत्यावश्यक असल्यास आधारकार्डचा Masked असलेली झेरॉक्स द्यावी, अशी सूचना सरकारने केली आहे.
Masked Aadhar Card मध्ये आधार क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक दिसतात. त्यामुळे तुमच्या आधार कार्डचा वापर करून होणारी शक्यता बरीच कमी होते.
Masked Aadhar Card हा UIDAI च्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येऊ शकते.
https://myaadhaar.uidai.gov.in/ या लिंकवर जा
तुमचा आधार क्रमांक नमूद करा
तुम्हाला Masked Aadhar Card हवाय का हा पर्याय दिसेल, तो निवडावा
Request OTP वर क्लिक केल्यानंतर 'आधार'शी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल, तो नमूद करावा.
डाउनलोडचा पर्याय निवडावा. आधार क्रमांकातील शेवटचे चार आकड्यांसह आधार कार्डची प्रत मिळवता येईल.