IRCTC Diwali Tour Package: दिवाळीनंतर ट्रिप प्लॅन करताय? IRCTCचे हे पॅकेज नक्की चेक करा!
यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होतीये. दिवाळीच्या सुट्यांमध्ये फिरायला जायचे प्लॅन सर्वांचेच असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडिअन रेल्वे टुरिझमच्या वेबसाईटवर तुम्ही अनेक टूर प्लॅन चेक करून शकता.
लडाख, तिरुपती, उटी यासह अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत.
ट्रिप साठी सीट बुक करण्यासाठी तुमच्यासाठी योग्य असलेल्या प्लॅन वर तुम्ही क्लिक करा. तुम्ही वेगवेगळे प्लॅन कम्पेअर देखील करू शकता.
प्लॅन सिलेक्ट केल्यावर तुम्हाला त्याची किंमत आणि त्यासोबत मिळणाऱ्या सुविधांची यादी मिळेल.
येथे तुम्हाला प्रवासाची तारीख सिलेक्ट करायची आहे, त्याचबरोबर प्रवाशांचे डिटेल्स तुम्हाला नमूद करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल. योग्य तो पर्याय निवडून पैसे भरल्यावर तुमचे टूर पॅकेज बुक होईल. मोबाईल नंबरवर तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील.
IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर सर्वोत्तम टूर पॅकेज तुम्ही सहजपणे बुक करु शकता. होमपेजवर ‘हॉलिडे’ वर क्लिक करा आणि ‘पॅकेज’ निवडा. मग जमीन, हवाई आणि रेल्वे टूर पॅकेजेसमधून निवडा आणि तुमची स्वप्नातील सुट्टी तुम्ही एका क्षणात बुक करू शकता.
IRCTC द्वारे ई-तिकीट बुक करताना प्रवासी GST सह फक्त 59 पैशांमध्ये तुम्ही ट्रेन प्रवासाचा विमासुद्धा काढू शकतात.
हे पॅकेज बुक करताना तुम्ही टूर गाइड, रोड ट्रान्सफर इत्यादीसारख्या अतिरिक्त सेवांचा समावेश सुद्धा करून घेऊ शकता.
हॉटेल बुक करण्यासाठी अधिकृत IRCTC पर्यटन वेबसाइटला भेट द्या आणि मुख्यपृष्ठावर ‘IRCTC हॉटेल्स’ वर क्लिक करा. बजेट हॉटेल्सपासून ते डिलक्सपर्यंत तुम्हाला सहजपणे बुक करता येणारी अनेक हॉटेल्स सापडतील.