Online Shopping Frauds: ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक? अशी घ्या खबरदारी
ऑनलाइन शॉपिंगकडे सध्या अनेकांचा कल वाढत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेगवेगळ्या ऑफर्स आणि घरपोच डिलिव्हरी यामुळे अनेकजण सामान खरेदीसाठी ई-कॉमर्स वेबसाइटला प्राधान्य देतात.
ऑनलाइन शॉपिंगच्या वाढत्या ट्रेंडमुळे त्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे.
ग्राहकाने मागवलेल्या वस्तू एक असतात आणि डिलिव्हरी दुसऱ्याच गोष्टीची झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
अनेक वेळा लोकांना रिकामे खोके किंवा रद्दी, दगड, बटाटे यांसारख्या वस्तूही डिलिव्हरीमध्ये दिसून आल्या आहेत.
तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर तुम्ही त्याबाबत तक्रार नोंदवू शकता.
तुमची फसवणूक झाली असेल, तर सर्वप्रथम तुमच्या ई-कॉमर्स वेबसाइटवरूनच तक्रार करा. तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून तुमची तक्रार नोंदवू शकता.
याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार सरकारच्या तक्रार निवारण पोर्टल INGRAM (Integrated Grievance Redressal System) मध्ये देखील नोंदवू शकता.
तुम्ही तुमची तक्रार ग्राहक व्यवहार साइट Consumerhelpline.gov.in वर नोंदवू शकता.
यासोबतच तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊनही तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय सायबर गुन्ह्याच्या बाबतीत तुम्ही पोलिसांत तक्रार दाखल करू शकता.
ऑनलाइन खरेदी करताना, एखाद्या नामांकित ई-कॉमर्स साइटवरूनच वस्तू खरेदी करा. पहिल्यांदाच ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा.