Hero MotoCorp : हिरो मोटोकॉर्पचा नफा 1081 कोटींवर पोहोचला, शेअरधारकांना दिली गुड न्यूज, लाभांश जाहीर

Hero MotoCorp : दुचाकी क्षेत्रातील कंपनी हिरो मोटोकॉर्पनं जानेवारी 2025 ते मार्च 2025 या तिमाहीतील कामगिरीचा निकाल जाहीर केला आहे.

हिरो मोटोकॉर्प

1/6
हिरो मोटोकॉर्पनं 13 मे म्हणजे आज आर्थिक वर्ष 2024-25 मधील चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा 6 टक्क्यांनी वाढून 1081 कोटी रुपये झाल्याची माहिती दिली. हिरो मोटोकॉर्पला गेल्या वर्षी मार्च तिमाहीत 1016 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
2/6
31 मार्च 2025 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न 4.4 टक्के वाढून 9938.65 कोटी इतका झाला आहे. या कामगिरीमुळं हिरो मोटोकॉर्पनं शेअरधारकांना 65 रुपये प्रति इक्विटी शेअर लाभांश जाहीर केला आहे. लाभांश वाटप आणि शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 24 जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
3/6
चौथ्या तिमाहीत कंपनीचं EBITDA मार्जिन वार्षिक आधारावर 14.3 टक्क्यांनी घसरुन 14.26 टक्के झाला आहे. EBITDA वार्षिक आधारावर 1418 कोटींवर पोहोचला आहे.
4/6
चौथ्या तिमाहीचे आकडे जाहीर होताच हिरो मोटोकॉर्पचे शेअर 2.5 टक्क्यांनी वाढून 4089 रुपयांवर पोहोचले.
5/6
गेल्या तीन महिन्यात कंपनीचा नफा 2.61 टक्क्यांनी वाढला आहे. तर, जानेवारीपासून स्टॉकमध्ये 2.5 टक्के शेअर घसरला आहे.हा स्टॉक एका वर्षात 17 टक्के घसरला आहे. तर, तीन वर्षात 65 टक्के तेजी मिळाली आहे.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola