Health Insurance Tips: आरोग्य विमा पॉलिसी घेताय? या गोष्टींकडे खास लक्ष
कोरोना महासाथीच्या काळानंतर अनेकजण आपल्या आरोग्याबाबत सजग झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभविष्यातील उपचारांच्या खर्चातून दिलासा मिळवण्यासाठी अनेकजण आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करत आहेत.
अनेक विमा कंपन्या आरोग्य विमा पॉलिसी विकतात. मात्र, पॉलिसी खरेदी करण्याआधी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
आरोग्य विमा खरेदी करताना कोणत्या आजारांवरील उपचाराचा समावेश आहे हे तपासून घ्या.
त्याशिवाय, तुम्हाला याआधीपासून एखादा आजार असल्यास त्याच्या उपचारावर विमा लागू होतो का, हेदेखील पाहून घ्या.
विमा कंपनी तुम्हाला कोणत्या रुग्णालयात कॅशलेस उपचार सुविधा देत आहेत, हे तपासून घ्या.
विमा कंपन्यांकडून कॅशलेस सुविधा असणाऱ्या रुग्णालयाची यादी दिली जाते. ही यादी नक्की पाहा.
जर तुम्हाला आरोग्य विम्यात अॅड-ऑन आणि रायडरची सुविधा मिळत असेल तर तुम्ही नक्की ही ऑफर घ्या. अपघाती प्रकरणात याची मोठी मदत होते.
आरोग्य विमा घेताना को-पे हा पर्याय निवडू नये. यामध्ये तुम्हाला उपचार खर्चाचा काही भाग स्वत:ला भरावा लागतो.
विमा पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश नाही याची यादीदेखील पाहा. त्यामुळे तुम्हाला विमा दावा करताना फायदा होऊ शकतो.