HDFC AMC : एचडीएफसी एएमसीचा नफा 18 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, लाभांश देणार, प्रति शेअर 'इतके' रुपये खात्यात येणार

HDFC AMC : एचडीएफसी एएमसीचा नफा 18 टक्क्यांनी वाढला आहे. बँकेनं शेअरधारकांना दिलासा देत लाभांश वाटप जाहीर करणार असल्याची घोषणा केली.

Continues below advertisement

एचडीएफसी एएमसी

Continues below advertisement
1/6
एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत 18 टक्क्यांनी वाढून 638 कोटी रुपये झाला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 541 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या महसुलात देखील मोठी वाढ झाली आहे.
2/6
आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 901 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वीच्या म्हणजे 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 695 कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीचं इतर उत्पन्न चौथ्या तिमाहीत 21 टक्क्यांनी घटून 123 कोटी रुपये झालं आहे.
3/6
मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा खर्च वाढून 189.6 कोटी रुपये झाला आहे. जो तिसऱ्या तिमाहीत 171 कोटी रुपये होता.
4/6
31 मार्च 2025 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळानं 31 मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी इक्विटी शेअर धारकांना 70 रुपये प्रतिशेअर लाभांश जाहीर केला आहे.
5/6
एचडीएफसी एएमसी एचडीएफसी म्युच्युअल फंड सह विविध गुंतवणूक फंड्सच्या असेट मॅनेजमेंटचं काम करते. एचडीएफसी एएमसीचा चा शेअर सध्या 4200 रुपयांवर असून आज त्यात 70 रुपयांची वाढ झाली आहे.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola