Google Pay Convenience Fee: गुगल पे वापरणाऱ्यांना झटका, डेबिट-क्रेडिट कार्डवरुन बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावे लागणार
Google Pay Convenience Fee: गुगल पे ही आजच्या काळाची गरज झाली आहे. दैनंदिन जीवनात दुकान किंवा इतरत्र कुठेही पैसे देण्यासाठी गुगल पेचा वापर केला जातो.
Google Pay Convenience Fee
1/8
सध्याच्या युगात डिजिटल पेमेंटसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या युपीआय प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Google Pay कडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
2/8
'गुगल पे'च्या या निर्णयामुळे वीज, गॅस यासारखी युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांकडून आता प्रक्रिया शुल्क (Processing Fee) आकारले जाणार आहे.
3/8
यापूर्वी गुगल पेकडून आकारण्यात येणारे या शुल्काचा भार ग्राहकांवर टाकला जात नव्हता. मात्र, आता 'गुगल पे'च्या माध्यमातून बिल पेमेंट केल्यास ग्राहकांना हे शुल्क भरावे लागणार आहे.
4/8
प्राथमिक माहितीनुसार, बिल पेमेंटसाठी ग्राहकांकडून एकूण व्यवहाराच्या 0.5 ते 1 टक्का शुल्क आकारले जाऊ शकते. तसे घडल्यास ग्राहकांना या अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
5/8
मात्र, क्युआर कोड स्कॅन करुन थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
6/8
फोन पे आणि पेटीएम या दोन्ही प्लॅटफॉर्मवर बिल पेमेंटसाठी यापूर्वीच शुल्क आकारणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता Google Pay कडूनही शुल्क आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे.
7/8
2024 या आर्थिक वर्षात फिनटेक कंपन्यांनी युपीआय व्यवहारांसाठीची 12 हजार कोटी रुपयांच्या प्रोसेसिंग फीचा भार स्वत: सहन केला होता. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षात नफा वाढवण्यासाठी या कंपन्यांनी आता या शुल्काचा भार ग्राहकांवर टाकायचे ठरवले आहे.
8/8
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 2000 रुपयांपेक्षा कमी पैशांच्या व्यवहारांसाठीचा व्यापारी कर रद्द करण्यास सांगितले होते. सरकार हे पैसे युपीआय कंपन्यांना देत होती. मात्र, तरीही या कंपन्यांना ग्राहकांकडून अपेक्षित नफा मिळत नव्हता.
Published at : 21 Feb 2025 12:40 PM (IST)