Gold Silver Rate : चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर

Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तेजी सुरु होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.

Continues below advertisement

सोने चांदी दर अपडेट

Continues below advertisement
1/5
दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 1 किलो चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरुन 1 लाख 50 हजार रुपयांवर आली. तर, 20 ऑक्टोबरला आयबीजेएच्या वेबसाईटवर चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले होते.
2/5
चांदीसह सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरच्या वायद्याच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर 2500 रुपयांनी कमी झाली. सोन्याचे दर 128000 वर आले.
3/5
शुक्रवारी म्हणजेच 17 ऑक्टोबरला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचे दर 1 लाख 70 हजार रुपये किलोवर पोहोचले होते. 20 ऑक्टोबरला मार्केट सुरु झालं तेव्हा चांदीचा दर 1 लाख 53 हजारांवर आला होता. मात्र, बाजार बंद होताना तो 1 लाख 58 हजारांवर होता. आज पुन्हा चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले म्हणजे उच्चांकावरुन चांदी 20 हजार रुपयांनी घसरली.
4/5
चांदीच्या दराप्रमाण सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. 17 ऑक्टोबरला सोन्याचा दर 1 लाख 32 हजार रुपये एक तोळा होता तो 21 ऑक्टोबरला 1 लाख 28 हजारांवर आला आहे. म्हणजेच वायदेबाजारात सोनं 4000 रुपयांनी घसरलं.
5/5
आयबीजेएच्या दरानुसार 20 ऑक्टोबरला चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले होते. तर सोन्याचे दर 4000 रुपयांनी कमी झाले. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 126730 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 122085 रुपये प्रति तोळा इतका आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola