सोनं आणखी महागणार? लवकरच गाठणार एक लाखाचा टप्पा?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारीही (5 जुलै) सोने-चांदी या धातूच्या दरात चांगली वाढ झालेली पाहायला मिळाली. सोनं शुक्रवारी गेल्या दीड महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं शुक्रवारी 1.1 टक्क्यांनी वाढून 2,381 डॉलर प्रति औंस वर पोहोचले होते.

देशांतर्गत बाजारातही सोन्याचा दर वाढलेला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) शुक्रवारी सोनं वायदा बाजारात 0.93 टक्क्यांनी महाग होत 73,038 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार सोन्याचा दर लवकरच ऑल टाईम हाय होऊ शकतो.
सोन्याच्या दरवाढीसाठी सध्या स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे भविष्यात सोन्याचा दर वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर ऑल टाईम हाय गेल्यास देशांतर्गत बाजारातही सोन्याचा दर वाढू शकतो. म्हणजेच आगामी काळात सोनं महाग होऊ शकतं.
सांकेतिक फोटो