Gold Silver Price: सोन्याचे दर वाढले, तर चांदीचे दर घसरले
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीच्या दरात घसरण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. सणासुदीच्या काळात दागिन्यांच्या दुकानात मोठी गर्दी दिसून येते.
धनत्रयोदिवशी सोनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. दरम्यान, जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
आज सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. तर वायदा बाजारात आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे
आज सोन्याचा दर हा 60 हजार 932 रुपये आहे. काल मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने 60 हजार 911 रुपयांवर बंद झाला होता.
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्यामध्ये किंचित वाढ होत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात घसरण नोंदवली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 0.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.