Gold Silver Price : चांदीची किंमत झपाट्याने वाढली, 1 किलोसाठी किती द्यावे लागतात पैसे? जाणून घ्या...

दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. या दरामुळं नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ लागत आहे. या वर्षी सोन्यापेक्षा चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

Continues below advertisement

Gold Silver Price

Continues below advertisement
1/9
एका आठवड्यातील चांदीच्या किमतीत ही दुसरी मोठी वाढ आहे. 6 ऑक्टोबर रोजी ती 7400 रुपयांनी वाढून 1 लाख 57 हजार 400 रुपये प्रति किलोग्रॅमवर ​​पोहोचली.
2/9
सध्या दिल्लीच्या बाजारपेठेत चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं दिसतच आहे. चालू आठवड्यात चांदीच्या किंमती 6,000 किंवा त्याहून अधिक वाढण्याची ही दुसरी वेळ आहे.
3/9
चांदीच्या किंमती वाढण्याची प्राथमिक कारणे म्हणजे वाढती औद्योगिक मागणी आणि भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता. दरम्यान, फेडरल रिझर्व्ह येत्या काही दिवसांत व्याजदर कपातीची घोषणा करु शकते, ज्यामुळे चांदीच्या किमतींना आधार मिळत असल्याचे दिसून येते.
4/9
दिल्लीतील सोन्याच्या किमती अपरिवर्तित राहिल्या आहेत. सध्या चांदीचे दर प्रतिकिलो 1 लाख 63 हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत.
5/9
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी चांदीच्या किमती 6000 रुपयांनी वाढल्या आहेत. सध्या चांदीची किंमत 1 लाख 63 हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
Continues below advertisement
6/9
यामुळे या आठवड्यात चांदीच्या किमतीत 13000 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी चांदीचे दर 1 लाख 50 हजार रुपये होते.
7/9
चालू वर्षाच्या दृष्टीने सोन्याच्या किमती 73 300 रुपयांनी किंवा 82 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या शेवटच्या व्यापारी दिवशी चांदीचे दर 89700 रुपयांवर पोहोचले.
8/9
दिल्लीत सोन्याचे दर कायम राहिलेत. स्थानिक सराफा बाजारात, गुरुवारी 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेचे सोने अनुक्रमे 1 लाख 26 हजार 600 रुपये आणि 1 लाख 26 हजार प्रति 10 ग्रॅम या त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर अपरिवर्तित राहिले.
9/9
चालू महिन्यात सोन्याच्या किमती 6 हजार 600 रुपयांनी वाढल्या आहेत, तर यावर्षी सोन्याच्या किमती 47 हजार 650 प्रति 10 ग्रॅमने वाढल्या आहेत.
Sponsored Links by Taboola