Gold Rate : चार दिवसांमध्ये सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, चांदीचे दर 4000 रुपयांनी वाढले, जाणून घ्या नवे दर
Gold Rate : सोने आणि चांदीचे दर गेल्या चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. चांदीच्या दरात 4000 रुपयांची तर सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे.
सोने दर अपडेट
1/6
सोने आणि चांदीच्या दरात गेल्या चार दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चांदीचे दर 4000 रुपयांनी तर सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले आहेत.
2/6
आयबीजेएच्या आकडेवारीनुसार 20 ऑगस्टला 24 कॅरेट सोन्याचा दर 98946 रुपयांवर होता. तर, चांदीचा दर 111194 रुपयांवर होता.जीएसटीशिवाय सोन्याच्या दरात 1938 रुपांची वाढ होऊन ते 100884 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरात दुप्पट वाढ होऊन ते 115870 रुपयांवर पोहोचले आहेत.
3/6
सोने आणि चांदीच्या दरातील वाढ आर्थिक घडामोडी आणि राजकीय घटनाक्रमांमुळं झाली आहे. जगभरात तणाव वाढला किंवा अस्थिरतेचं वातावरण निर्माण झाल्यास गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीत गुंतवणूक करतात.
4/6
मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 404 रुपयांनी महाग होऊन ते जीएसटीशिवायचा दर 100884 रुपयांवर पोहोचले. तर 23 कॅरेट सोन्याच्या दरात 337 रुपयांची वाढ होऊन ते 100423 रुपयांवर पोहोचले.
5/6
22 कॅरेट सोन्याचे दर 92410 रुपयांवर होते. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 297 रुपयांची वाढ होऊन ते 75663 रुपयांवर पोहोचले. तर 14 कॅरेट सोन्याची एका तोळ्याची किंमत 59017 रुपये होती. सोन्याचे हे दर जीएसटीशिवायचे आहेत.
6/6
सोन्याचे दर 2025 मध्ये 25144 रुपयांनी वाढले आहेत. तर, एक किलो चांदीच्या दरात 29853 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबरला सोन्याचा एका तोळ्याचा दर 75740 रुपये तर चांदीचा दर 86017 रुपये किलो होता.
Published at : 27 Aug 2025 01:15 PM (IST)