Gold Rate : सोनं आणखी रडवणार, 13 महिन्यात 40 टक्के दर वाढले, 25 हजार रुपये अधिक खर्च करावे लागणार

Gold Price : सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. 21 फेब्रुवारीला सोन्याचा दर 88239 रुपये 10 ग्रॅम होता.

सोने दर

1/5
सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सोन्याच्या दरातील वाढीचा वेग कायम राहिल्यास लवकरच एक लाखांचा टप्पा पार होण्याची शक्यता आहे. गेल्या 13 महिन्यात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली.
2/5
21 फेब्रुवारी म्हणजे काल 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 88223 रुपये इतके होते. 21 जानेवारी 2024 ला सोन्याचा दर 63000 रुपये होता. म्हणजेच वर्षभरात सोन्याचा दर 25 हजारांनी वाढला आहे.
3/5
सोन्याच्या दरातील तेजीचं कारण आर्थिक बाजारात आलेली तेजी आणि भारतात वाढत असलेली मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2 हजार डॉलर औंस वर पोहोचला आहे.
4/5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीन, मेक्सिको आणि कॅनडासह अनेक देशांवर टॅरिफ लादण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळं संकट टाळण्यासाठी गुंतवणूकदार सोन्यात पैसे गुंतवत आहेत. यामुळं जगभरात सोन्याच्या किमती वाढत आहेत.
5/5
जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर जाणकारांच्या सल्ल्यानुसार बाजारावर लक्ष ठेवून योग्य वेळी गुंतवणूक करावी. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित पर्याय म्हणून पाहिली जाते.
Sponsored Links by Taboola