Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे', वाचा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,080 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today
1/9
Gold Rate Today : लग्नसराईचा मुहूर्त सुरु झाला आहे. या निमित्ताने अनेक ग्राहक बाजारपेठेत सोन्या-चांदीची खरेदी करतात.
2/9
तुळशी विवाहानंतर भारतात सगळीकडे लग्नसराईला सुरुवात होते. हा लग्नसराईचा काळ साधारण मे महिन्यापर्यंत असतो.
3/9
मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळतोय. त्यामुळे या दरम्यान मौल्यवान धातूंची जास्त खरेदी कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळतेय.
4/9
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.25 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,080 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,440 रुपये आहे
5/9
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमधली दर पाहता 22 कॅरेट सोन्याचा दर 48,657 वर आला आहे. तर हाच दर इतर शहरांतही दिसून आला.
6/9
जागतिक बाजारातील दर पाहता, स्पॉट सोने 0059 GMT नुसार प्रति औंस $1,633.69 वर लिस्टलेस होते, यापूर्वी 21 ऑक्टोबरपासून सर्वात कमी पातळी गाठली होती. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी घसरून $1,636.30 वर आले.
7/9
स्पॉट सिल्व्हर 0.2% वाढून $19.18 प्रति औंस, प्लॅटिनम 0.1% घसरून $924.51 वर आणि पॅलेडियम 0.9% वाढून $1,856.91 वर आले.
8/9
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.
9/9
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
Published at : 18 Nov 2022 11:51 AM (IST)