Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किंचित महाग; वाचा तुमच्या शहरातील दर

Gold Rate Today : नवीन वर्ष 2023 ला सुरुवात झाली आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झालेली आहे.

Gold Rate Today

1/9
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळतेय.
2/9
याचं मुख्य कारण म्हणजे जागतिक दरवाढीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येतो. त्यामुळे सोन्याचे दर अस्थिर पाहायला मिळतायत.
3/9
आजचे सोन्याचे दर पाहता कालच्या तुलनेत आजचे दर काहीसे स्थिर आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात फारसा फरक पडलेला नाही.
4/9
सध्या सगळीकडे लग्नसराईचा काळदेखील सुरु आहे. त्यामुळे बाजारात यावेळी सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, सोन्याच्या वाढलेल्या दराने ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
5/9
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,470 रूपयांवर व्यवहार करत आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 50,840 रूपये आहे.
6/9
आज एक किलो चांदीचा दर 68,330 रूपयांवर व्यवहार करत आहे. त्यामुळे चांदी किंचित महाग झाली आहे.
7/9
सोन्याचे दर हे महाराष्ट्रात देखील कमी अधिक फरकाने मागे-पुढे होत असतात.
8/9
जागतिक बाजारातील मौल्यवान धातूंची किंमत पाहता स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.5% वाढून $1,886.70 प्रति औंस झाले.
9/9
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
Sponsored Links by Taboola