Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Rate Today : सोन्याहून चांदी झाली महाग! एक किलो चांदीचा दर 69 हजारांच्या घरात
चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच जागतिक डॉलरचे वाढलेले दर यामुळे भारतातील मौल्यवान धातूंचे दर वाढताना दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येतो. यामुळेच भारतात सोन्या-चांदीचे दर वाढलेले आहेत.
सोन्याचे दर 56 हजारांपर्यंत पोहोचले होते. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी आकडेवारी होती.
त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागत होती. मात्र, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 54,590 रूपयांवर व्यवहार करतोय.
तर आज एक किलो चांदीचा दर 68,910 रूपयांवर व्यवहार करतोय. चांदीचे दर मात्र, दिवसेंदिवस वाढत जात आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह सोन्याचे दर संपूर्ण महाराष्ट्रात सारख्याच दराने व्यवहार करत आहेत.
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.
स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.