सोन्याला पुन्हा झळाळी! एका दिवसात तब्बल 'इतक्या' रुपयांनी महागलं, जाणून घ्या एका ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Gold And Silver Rate Today : सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आगामी काळातही सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

gold rate today

1/6
सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजदेखील (3 फेब्रुवारी) सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंची किंमत वाढली आहे.
2/6
आज राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव 400 रुपयांनी वाढून थेट 85,300 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला.
3/6
ऑल इंडिया सराफा असोशिएशनच्या म्हणण्यांनुसार सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे हा दर वाढला आहे. सोबतच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळेही सोन्याचा भाव वाढल्याचे म्हटले जात आहे.
4/6
शनिवारी 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 84,900 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज 99.5 टक्के शुद्धता असणाऱ्या सोन्याच्या भावातही वाढ झाली आहे. आज हे सोने 400 रुपयांच्या वाढीसह 84,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
5/6
चांदीच्या दरातही आज वाढ झालेली आहे. आज चांदी 300 रुपयांनी वाढली असून सध्याचा भाव 96,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. याआधीच्या सत्रात चांदीचा भाव 95,700 रुपये प्रति किलो होता.
6/6
सांकेतिक फोटो
Sponsored Links by Taboola