Gold Rate : अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशीच सोनं महागलं, एक ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Gold And Silver Rate Today : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा विक्रमी एकदा वाढ झाली आहे. अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी ही वाढ झाली आहे.

gold rate today (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/7
Gold And Silver Rate Today : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या तरतुदी होण्याची शक्यता आहे. सोबतच महागाई,खाद्य पदार्थांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
2/7
दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी भारतीय शेअर बाजार आणि सराफा बाजारात मोठा चढउतार पाहायला मिळाल आहे. सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
3/7
सराफा बाजारात आज म्हणजेच 31 जानेवारी 2025 रोजी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याचा भाव आता 82 हजारांच्याही (प्रति दहा ग्रॅम) पुढे गेला आहे. तर चांदीचा भाव 93 हजार प्रति किलोपेक्षा जास्त झाला आहे.
4/7
राष्ट्रीय पातळीवर बोलायचं झाल्यास 999 शुद्धता (Fineness) असणाऱ्या म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा भाव 82165 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहेत. तर 999 शुद्ध असणाऱ्या चांदीचा (Silver) भाव 93177 रुपयांवर पोहोचला आहे.
5/7
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (India Bullion And Jewellers Association) गुरुवार रात्री 24 कॅरेट सोन्याचा भाव 81303 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हाच भाव आज (शुक्रवार) सकाळी 82165 रुपयांवर पोहोचला आहे. अशाच पद्धतीने चांदीच्या भावातही वाढ झाली आहे.
6/7
999 शुद्ध सोन्याचा गुरुवारचा भाव 81303 रुपये होता. हाच भाव शुक्रवारी 82165 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच एका दिवसात 999 टक्के शुद्ध सोने 862 रुपयांनी महागले.
7/7
995 शुद्ध सोन्याचा भाव गुरुवारी 80977 रुपये होता. हाच भाव शुक्रवारी 81836 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच हे सोने एका दिवसात 859 रुपयांनी वाढले आहे.
Sponsored Links by Taboola