Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement
1/7
24 कॅरेट सोन्याच्या दरात 360 रुपयांची घसरण होऊन ते 134120 रुपये 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याचा दर देखील 122943 रुपयांवर आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घसरण झाली आहे.
2/7
आंतरराष्ट्रीय स्पॉट गोल्ड रेट, अमेरिकेच्या डॉलरच्या विनिमय दराती बदल आणि सोन्यावरील आयात शुल्क याचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो.
3/7
भारतात सोन्याचे दर 2025 मध्ये 56654 रुपयांनी महागले आहेत. भारतात सोन्याचा दर दुबईच्या तुलनेत अधिक आहे. 19 डिसेंबरला भारतातील 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 134120 रुपये आहे.
4/7
दुबईतील दर 112816 रुपये आहे. म्हणजेच भारतात दुबईच्या तुलनेत सोनं 21304 रुपयांनी महाग मिळतंय. दुबईच्या तुलनेत भारतात 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर अधिक आहेत.
5/7
एकीकडे सोन्याचे दर वर्षभरात 56654 रुपयांनी वाढले आहेत. त्यावेळी चांदीच्या दरात देखील वर्षभरात 114319 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा आजचा जीएसटीशिवायचा दर 201120 रुपये आहे. तर, जीएसटीसह चांदीचा दर 206346 रुपयांवर पोहोचला आहे.
Continues below advertisement
6/7
पुणे आणि मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 360 रुपयांची घसरण होऊन ते 134120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले.
7/7
22 कॅरेट सोन्याचा मुंबईतील दर देखील 330 रुपयांनी कमी होत 122943 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 270 रुपयांनी कमी होऊन 100590 रुपयांवर पोहोचला आहे.
Published at : 19 Dec 2025 05:34 PM (IST)