Gold Rate : नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात सोने दराची मोठी झेप, जानेवारीत सोनं तब्बल 4400 रुपयांनी वाढलं, जाणून घ्या कारणं...

अर्थसंकल्पापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्वेलर्स अन् रिटेलर्सकडून मोठ्या संख्येनं खरेदी सुरु असल्यानं 10 ग्रॅम सोन्याचा दर 83750 रुपयांवर पोहोचला आहे, हा दर ऑल इंडिया सर्राफा असोसिएशननं माहिती दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
1 जानेवारी 2025 ला 10 ग्रॅम सोन्याचा दर 79390 रुपये होता. 29 जानेवारीला दर 4360 रुपयांनी वाढून 83750 रुपयांवर पोहोचला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 93000 रुपयांवर पोहोचला आहे. काल चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारी महिन्याच्या वायद्यासाठी सोन्याच्या दरात 228 रुपयांची वाढ होत ते 80517 रुपयांवर पोहोचलं. एप्रिल 2024 मध्ये एमसीक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 81098 वर पोहोचला होता.
डॉलर इंडेक्समधील तेजी आणि अमेरिकेतील घटलेली ग्राहकांची या संदर्भातील डेटानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याचे वायदे 2794.70 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहेत.
एचडीएफसी सिक्युरीटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी बुधवारच्या (30 जानेवारी) दरवाढीवर भाष्य केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इतर देशांवर टॅरिफ लादलं जाणार असल्यानं गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाचा विचार करत आहेत.