Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प इफेक्टमुळं सोने चांदी दरात तेजी, 1100 रुपयांनी सोनं महागलं, चांदींचे दर 1 लाखांच्या जवळ
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात तेजी कायम आहे. मंगळवारी (4 मार्च 2025) ला सोन्याचे दर 89000 रुपयांवर पोहोचले. तर, चांदीचे दर 98 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
Continues below advertisement
सोने चांदीच्या दरात वाढ सुरुच
Continues below advertisement
1/5
दागिने विक्रेते आणि स्टॉकिस्टकडून लिलाव वाढल्यानं आणि जागतिक स्थितीच्या परिणामामुळं राजधानी नवी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचे दर 1100 रुपयांनी वाढून 89000 हजार रुपयांवर पोहोचले. अखिल भारतीय सराफा संघानं ही माहिती दिली.
2/5
99.9 टक्के शुद्ध सोने म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचे दर 89000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले. तर, सोमवारी बाजार बंद झाला तेव्हा याचा दर 87900 इतका होता. तर, 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा 10 ग्रमॅचा दर 1100 रुपयांनी वाढून 88600 इतका झाला. सोमवारी हा दर 87500 रुपये होता.
3/5
सोने आणि चांदीच्या व्यापाऱ्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाला दुजोरा दिल्यानंतर सोने चांदीच्या दरात वाढ झाली. चीन, कॅनडानं देखील अमेरिकेविरुद्ध कारवाई करण्याची घोषणा केली. त्यामुळं उत्तर अमेरिकेत व्यापार तणाव वाढला.
4/5
औद्योगिक क्षेत्रातील मागणी आणि सोन्यातील तेजीमुळं चांदीच्या दरात 1500 रुपयांची वाढ होऊन ते 98000 रुपये किलोवर पोहोचली. सोमवारी चांदीचे दर 96500 रुपये प्रति किलो होते. एप्रिलच्या वायद्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील कॉमेक्स सोन्याचा वायदा 32.70 डॉलर वाढून 2933.80 डॉलर प्रति औंस इतका झाला.
5/5
एचडीएफसी सिक्यूरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मतानुसार सोमवारी जारी करण्यात आलेल्या आयएमएस उत्पादन पीएमआय आकडेवारीत अपेक्षेपेक्षा कमी असल्यानं आर्थिक आघाडीवर आणखी एक निराशाजनक संकेत मिळाला. वाढत्या बेरोजगारीचे दावे, ग्राहकांच्या क्रयशक्तीमधील घट याचा देखील परिणाम दिसतो. अमेरिका फेडरल रिझर्व्ह अपेक्षेपेक्षा लवकर व्याज दरात कपात करेल, अशी आशा आहे.
Continues below advertisement
Published at : 05 Mar 2025 07:18 AM (IST)