Gold Rate : सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण, 24 जूनपासून सोन्याचे दर 2700 रुपयांनी घटले, नवा दर जाणून घ्या

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात गेल्या चार दिवसांपासून सातत्यानं घसरण सुरु आहे. इराण इस्त्रायल शस्त्रसंधी झाल्यानंतर लोकांचा कल शेअर बाजारातील गुंतवणुकीत वाढला आहे.

सोने दर

1/5
सोने आणि चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर 1024 रुपयांनी घसरुन 96135 रुपयांवर आले. तर, चांदीचे दर 350 रुपयांनी घसरुन 106800 रुपयांवर आले. 23 जूनला 24 कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा दर 98884 रुपये होता. 27 जूनला तो दर 96135 रुपयांवर आला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात 2749 रुपयांची घसरण झाली आहे.
2/5
जीएसटीसह एक तोळ्याचे सोन्याचे दर एक लाखांच्या खाली आले आहेत. जीएसटीसह सोन्याचा दर 99019 रुपये 10 ग्रॅम तर चांदीचा एक किलोचा दर 110004 रुपये आहे.
3/5
23 कॅरेट सोन्याचा दर 1020 रुपयांनी घसरुन 95750 रुपये एक तोळा झाला आहे. तर, 22 कॅरेटच्या एक तोळे सोन्याचा दर 938 रुपयांनी घसरुन 88060 रुपयांवर आला आहे. 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घसरण झाली. 18 कॅरेटचा दर 72101 तर 14 कॅरेटचा एक तोळ्याचा दर 56239 रुपये इतका आहे.
4/5
इराण आणि इस्त्रायल यांच्यामधील युद्धाच्या काळात सोन्याचे दर वेगानं वाढत होते. मात्र, इराण- इस्त्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर सोन्याचे दर घसरत आहेत. सोन्याचे वरील दर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं जारी केले आहेत. वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या दरांमध्ये 1000 ते 2000 रुपयांचा फरक असेल.
5/5
31 डिसेंबर 2024 ला एक तोळे सोन्याचा दर 76025 रुपये होता. तर, चांदीचा एक किलोचा दर 85680 रुपये इतका होता. तेव्हापासून सोन्याच्या दरात 20395 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात 20783 रुपयांची वाढ झाली आहे.
Sponsored Links by Taboola