Gold Rate : सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
Gold Rate : गेल्या महिन्याभरात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 8000 रुपयांची घसरण झाली आहे.
Continues below advertisement
सोन्याच्या दरात घसरण
Continues below advertisement
1/6
भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एक तोळे सोन्याच्या दरात 8000 रुपयांची घसरण झाली आहे. याचं कारण जागतिक बाजारातील संमिश्र संकेत, भारत- अमेरिका ट्रेड डीलबाबत सकारात्मक स्थिती आणि फेड रिझर्व्हच्या डिसेंबरमधील व्याज दर कपातीचा परिणाम आहे.
2/6
ऑक्टोबरमध्ये सोन्याचा एका तोळ्याचा दर 132294 रुपयांवर होता. त्यानंतर 21 नोव्हेंबर पर्यंत सोन्याचा दर 8099 रुपयांनी कमी होऊन 124195 रुपयांवर पोहोचला आहे.
3/6
मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार शुक्रवार सोन्याचे दर बदलले नाहीत. ते 124195 रुपयांवर कायम आहेत. सोन्याच्या दरातील घसरणीचं कारण रुपया कमजोर होणं हे आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर हऊन 89.43 रुपयांवर पोहोचला.
4/6
आयबीजेएच्या उपाध्यक्षा अक्षा कम्बोज यांच्या मते लग्नसराई सुरु झाल्यानं सोन्याची मागणी वाढली आहे. यामुळं 24 कॅरेट सोन्याचे दर किरकोळ वाढलेत. या वाढलेल्या मागणीशिवाय गुंतवणूकदार सतर्क देखील झाले आहेत. सोन्याच्या दरात तेजी आणि घसरण सुरु आहे. कंबोज यांच्या मते दागिने खरेदी करणारे आणि गुंतवणूकदार या स्थितीचा फायदा घेत आहेत.
5/6
एस एस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेव यांच्या मते ऑक्टोबर पासून सोनं 118000 ते 128000 रुपयांदरम्यान ट्रेड करत आहे. स्थूल अर्थशास्त्रीय घटक यातील अस्थिरता वाढवत आहेत. न्यूयॉर्क येथील फेड रिझर्व्हचे चेअरमन जॉन विलियम यांच्या दर कपातीच्या संकेतानंतर त्यात सोने दरात सुधारणा दिसून येत आहे.
Continues below advertisement
6/6
सुगंधा सचदेव यांनी टेक्निकल लेव्हल्सचा विचार केला असता सोन्याला 121700 रुपयांचा सपोर्ट मिळेल तर. सोनं 128000 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. जर 128000 रुपयांच्या पार गेल्यास नव्या विक्रमाच्या दिशेनं जाऊ शकतं.
Published at : 22 Nov 2025 11:06 PM (IST)