Gold Rate : गुड न्यूज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 1500 रुपयांनी घसरलं, चांदीचे दर घटले, गुंतवणूकदारांचा मोठा निर्णय

सोन्याच्या दरानं काल उच्चांक गाठला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर काल 86360 रुपयांवर पोहोचले होते. तर, सर्राफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे दर 89500 रुपयांपर्यंत पोहोचले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 1500 रुपयांनी घसरुन 85000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एमसीएक्सवर सोन्याप्रमाणं चांदीच्या दरातदेखील घसरण झाली आहे. एमसीएक्सवर एक किलो चांदीचे दर 95000 रुपयांच्या खाली आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. कॉमेक्सवर सोन्याचे दर 2910 डॉलरच्या खाली पोहोचले आहेत. जे उच्च पातळीवरुन 60 डॉलरनी घसरले आहेत.अमेरिकनं डॉलरची मजबुती अन् बॉण्ड यील्डमधील वाढीमुळं गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरु केली आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरासंदर्भातील अनिश्चितता, डॉलर इंडेक्सममधील मजबुती, जागतिक बाजारातील चढ उतारामुळं गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय शोधण्यास सुरुवात केलीय.
जर डॉलरमधील मजबुती आणि व्याज दरामधील वाढीच्या शक्यतेमुळं सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळू शकते. बंगळुरु, मुंबई, पुणे, कोलकाता,हैदराबाद, चेन्नई मध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 87930 इतका आहे.लखनौ, नवी दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 87540 रुपये आहे. इंदोर, अहमदाबादमध्ये 10 ग्रॅम सोन्याचादर 87440 रुपये आहे.