लग्नसराईत खुशखबर! 7 दिवसांत सोनं तब्बल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती पैसे?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात सोनं साधारण 3710 रुपयांनी स्वस्त झालं आहे. राजधानी दिल्लीचा विचार करायचा झाल्यास 17 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 75800 रुपये प्रति10 ग्रॅम होता. त्यामुळे आता कोणत्या शहरात सोन्याचा भाव किती आहे? तसेच सोन्याच्या भावात घट नेमकी का होत आहे? ते जाणून घेऊ या...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनीकंट्रोल या वृत्तविषय संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली शहरात 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर याच शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मुंबई आणि कोलकाता या शहरांत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 75,650 रुपये तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 69,350 रुपये होता.
चेन्नई या शहात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,600 रुपये होता. भोपाळ आणि अहमदाबाद या शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,700 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये 24 कॅरेट असलेल्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 75,800 रुपये होता. जयपूर आणि चंडीगडमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव लखनौप्रमाणेच होता.
अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह बँकेने सलग FOMC बैठकीत व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला आहे.
याचाच परिणाम सोन्यावर होतोय. सोन्याच्या भाव कमी होताना दिसतोय. जागतिक सोने बाजारात सोन्याचा भाव 2,570.10 डॉलर प्रति औंस आहे. गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याचा दर 2622.45 डॉलर प्रति औंस होता.
संग्रहित फोटो