Gold Rate : चांदी 2280 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या सोने अन् चांदीचे नवे दर
Gold Rate: सोने आणि चांदीच्या दरात गुरुवारी घसरण पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर 2280 रुपयांनी घसरले. तर, सोन्याच्या दरात 1000 रुपयांची घसरण झाली.
Continues below advertisement
सोने आणि चांदीच्या दरात घसरण
Continues below advertisement
1/5
भारतात सोने आणि चांदीच्या दरात 20 नोव्हेंबर रोजी घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 122881 रुपयांवर पोहोचला. सोने 1003 रुपयांनी स्वस्त झालं. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील घसरण होऊन ते 112559 रुपयांवर पोहोचला.
2/5
चांदीच्या दरात देखील आज मोठी घसरण पाहायला मिळाली. 19 नोव्हेंबरच्या तुलनेत चांदीचे दर 2280 रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीचा एक किलोचा दर 155840 रुपयांवर पोहोचला आहे.
3/5
23 कॅरेट सोन्याच्या दरात आज 999 रुपयांची घसरण झाली. 23 कॅरेटचे एका तोळ्याचे दर 123388 रुपयांवरुन घसरुन 122389 रुपयांवर आले. 20 नोव्हेंबरला 22 कॅरेट सोन्याच्या दरात 919 रुपयांची घसरण झाली.
4/5
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्सकडून जारी करण्यात आलेले दर संपूर्ण देशभरात मान्य असतात. हे दर जीएसटीशिवायचे असतात. सोने किंवा चांदी खरेदी करताना ग्राहकांना करासह मेकिंग चार्जेस देखील द्यावे लागतात.
5/5
2025 मध्ये सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. 31 डिसेंबरला सोन्याचे दर 75 हजार रुपयांवर होते. 20 नोव्हेंबरला सोन्याचे दर 122881 रुपयांवर आहेत. म्हणजेच सोन्यातील गुंतवणूकदारांना जवळपास 40 ते 45 टक्के परतावा मिळाला आहे.
Continues below advertisement
Published at : 20 Nov 2025 04:27 PM (IST)