सोन्याचे दर कधी कमी होणार? चालू वर्षात सोन्याच्या दरात 15 टक्क्यांची वाढ
सोन्याच्या दरात (Gold Price) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाढत्या दरामुळं सोन्यावरील शुल्क कमी करण्याची देखील मागणी होत आहे
अर्थसंकल्पानंतर (Budget) सोन्याच्या दरात घसरण होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
वाढत्या सोन्याच्या दरामुळं लोक सोन्याच्या खरेदीकडं पाठ फिरवत असल्याचं पाहायला मिळत आहे. दर वाढल्यामुळं लोक सोने खरेदीचा निर्णय पुढे ढकलत आहेत.
अर्थसंकल्पामुळं सोन्याचे भाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सुमारे 2 टक्क्यांनी महागले आहे.
देशांतर्गत बाजारात शुक्रवारी, MCX वर सोन्याचा दर हा 73,285 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 63,870 रुपये होता, तो आता 73 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. याचाच अर्थ या वर्षासाठी सोने आता सुमारे 15 टक्क्यांनी महागले आहे.
प्रिल ते जून तिमाहीत देशातील सोन्याची मागणी वार्षिक आधारावर 15 टक्क्यांनी घसरली आहे. वाढत्या किमतीमुळं लोक सोने खरेदीपासून दूर राहत आहेत.
बाजारात सोन्याची मागणी घसरल्यानं ज्वेलरी उद्योग नाराज आहे. सरकारनं अर्थसंकल्पात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
सरकारनं सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरुन 10 टक्के करावे, अशी दागिने उद्योगाची मागणी आहे.