Gold Price: आनंदाची बातमी! सोन्याचा भाव 55 हजारांपर्यंत खाली येणार?
Gold Rates Today: सोन्यातील गुंतवणूक ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोन्याचा भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आगामी काळासाठी आणखी सोने विकत घ्यावे की सोन्याचे दर पडतील, याविषयी संभ्रम आहे.
Continues below advertisement
Gold price may fall
Continues below advertisement
1/10
गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याचा भाव झपाट्याने वाढताना दिसत आहेत. 10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा दर आता एक लाखांच्या जवळपास जाऊन पोहोचला आहे. मात्र, पुढील काही दिवसांत सोन्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.
2/10
अमेरिकेतील मॉर्निंगस्टारच्या अंदाजानुसार येत्या काळात सोन्याचे दर 38 टक्क्यांनी घसरतील, असा अंदाज आहे.
3/10
शुक्रवारी देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 90000 रुपये इतका होता. जागतिक बाजारात सोन्याचे दर 3100 डॉलर प्रति आौंस इतके आहेत. यामध्ये जवळपास 40 टक्के घसरण होण्याची शक्यता आहे.
4/10
भारतीय बाजारात सोन्याचे दर जवळपास 10 ग्रॅमसाठी 55000 रुपयांवर येऊ शकतात, असा अंदाज मॉर्निंगस्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स यांनी वर्तवला आहे.
5/10
मंगळवारी देशभरात सोन्याच्या दरात आज 1600 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळाले. हा ट्रेंड आगामी काळात कायम राहू शकतो.
Continues below advertisement
6/10
सोन्याचे दर घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे सोन्याचं उत्पादन मोठ्याप्रमाणात वाढलं आहे. 2024 च्या दुसर्या तिमाहीत खाणकामामुळं होणारा नफा 950 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. सोन्याचा जागतिक साठी 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन झाला आहे. ऑस्ट्रेलियानं सोन्याचं उत्पादन वाढवलं आहे. तसेच रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढला आहे.
7/10
2024 मध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी 1,045 टन सोने खरेदी केले. मात्र, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्व्हेनुसार, 71% सेंट्रल बँकर्स पुढील वर्षी सोने खरेदी कमी करू शकतात. केंद्रीय बँकांनी गेल्या वर्षी 1045 टन सोन्याची खरेदी केली होती, त्यांच्याकडून मागणी कमी केली जाऊ शकते. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका सर्व्हेनुसार 71 सेंट्र्ल बँकांनी सोन्याचा साठा कमी करणे किंवा जितका साठा आहे तितका कायम ठेवण्याचं नियोजन करण्यात येत आहे.
8/10
गेल्या काही महिन्यांत जागतिक अस्थिरता, महागाई आणि अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवला. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या. मात्र, हे दर किती काळ टिकतील, यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.
9/10
2024 मध्ये सोन्याच्या उद्योगातील व्यवहार 32% वाढले आहेत. भूतकाळात असे व्यवहार वाढले की त्यानंतर सोन्याच्या किमती घसरल्याचे आढळले आहे.
10/10
बँक ऑफ अमेरिकेच्या अंदाजानुसार पुढील दोन वर्षांत सोन्याचा दर 3,500 डॉलर प्रति औंसपर्यंत जाईल. तसेच, गोल्डमॅन सॅक्सच्या मते, 2025 च्या अखेरीस सोन्याचा दर 3,300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज आहे.
Published at : 05 Apr 2025 09:13 AM (IST)