Gold Silver Rate : चांदीनं सव्वा दोन लाखांचा टप्पा गाठला, सोने दराचा नवा उच्चांक, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर

Gold Price Update: सोने आणि चांदीच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे. चांदीनं जीएसटीसह सव्वा दोन लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचे दर देखील वाढलेत.

Continues below advertisement

सोने दर आणि चांदी दर अपडेट

Continues below advertisement
1/6
सोने आणि चांदीच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात 7954 रुपयांची वाढ होऊन एक किलो चांदीचा दर 218954 रुपांवर पोहोचला आहे. तर, सोन्याच्या दरात देखील 352 रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह चांदीचा दर 225522 रुपयांवर पोहोचला आहे. तर, जीएसटीसह सोन्याचा दर 140734 रुपयांवर पोहोचला.
2/6
मंगळवारी चांदीचा विना दर जीएसटी 211000 रुपये किलो होता. सोन्याचा जीएसटीशिवायचा दर 136283 रुपये होता. आज सोन्याच्या दरानं 136635 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. तर, चांदीचा दर 218954 रुपयांवर पोहोचला आहे. यंदा सोन्याचा दर 60895 रुपयांनी वाढला आहे, तर चांदीच्या दरात 132937 रुपयांची वाढ झाली आहे.
3/6
अमेरिकेच्या फेड कडून 2026 मध्ये देखील व्याज दर कपातीची शक्यता असल्यानं सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय अमेरिकन डॉलर कमजोर झाल्यानं त्याचा देखील परिणाम सोने दरावर दिसून आला.
4/6
23 कॅरेट सोन्याच्या दरात 351 रुपयांची वाढ होऊन ते 136088 रुपयांवर पोहोचले. जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याचा दर 140170 रुपयांवर पोहोचला आहे.
5/6
22 कॅरेट सोन्याचा दर 264 रुपयांनी वाढून 125158 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह याचा दर 128912 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 264 रुपयांची वाढ झाली. 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 102467 रुपये आहे. जीएसटीसह हा दर 105550 रुपये आहे. 14 कॅरेट सोन्याच्या दरात 205 रुपयांची वाढ दिसून आली, आजचा 14 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 79931 रुपये तर जीएसटीसह सोन्याचा दर 82328 इतका आहे. आयबीजेएकडून दिवसातून दोन वेळा सोने दर जाहीर केले जातात. आयबीजेएचे दर आणि तुमच्या शहरातील दर यात 1 ते 2 हजार रुपयांचा फरक असू शकतो.
Continues below advertisement
6/6
image 6
Sponsored Links by Taboola