Gold Rate : सोने दरानं ट्रेंड बदलला, सोनं पुन्हा एक लाखांवर, खरेदीपूर्वी जाणून घ्या नव्या दरांची अपडेट
Gold Silver Price 3 July: सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाखांच्या वर गेला आहे.
सोने दर
1/5
Gold Silver Price 3 July: सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. आज (3 जुलै)रोजी सोन्याचाद 306 रुपयांनी वाढला तर चांदीचे दर 1060 रुपयांनी वाढले आहेत. आज एक तोळा 24 कॅरेट सोन्याचा दर 97786 रुपये इतका होता. यामध्ये जीएसटीचा समावेश केला असता 24 कॅरेट एका तोळ्याचा दर 100719 रुपये इतका आहे. तर, चांदीचा दर 110980 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.
2/5
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या रेट्सनुसार 23 कॅरेट सोन्याचा दर 97394 रुपये एक तोळा इतका होता. हे दर आज बाजार सुरु झाला तेव्हाचे आहेत. 22 कॅरेट सोन्याचे एक तोळ्याचे दर 280 रुपयांनी वाढून 89572 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह हा दर 92259 रुपये इतका असेल.
3/5
18 कॅरेट सोन्याचा दर देखील 230 रुपयांनी वाढून 73340 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचले आहेत. 3 टक्के जीएसटीसह सोन्याचा दर 75540 रुपयांवर पोहोचला आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 179 रुपयांनी वाढून 57205 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर 58921 रुपये इतका आहे. हे दर मेकिंग चार्जेस शिवायचे आहेत.
4/5
सोने आणि चांदीचे दर हे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन जारी केलेले आहेत. तुमच्या शहरातील सोन्याच्या दरात 1000 ते 2000 रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेएकडून दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता दर जारी केले जातात.
5/5
सर्राफा बाजारात 1 जानेवारीपासून सोन्याचे दर 22046 रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदीचे दर 21731 रुपये प्रतिकिलोनं वाढले आहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 76045 रुपये 10 ग्रॅम इतका होता. तर, चांदीचा दर 85680 रुपये इतका होता.
Published at : 03 Jul 2025 03:22 PM (IST)