Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, इराण -इस्त्रायल शस्त्रसंधीचा परिणाम सुरुच

Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु होती. इराण-इस्त्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानं सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम दिसून येत आहे.

सोने दर

1/5
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील शस्त्रसंधीचा परिणाम बुलियन मार्केटसवर दिसून येत आहे. शेअर बाजारात तेजी येताच सर्राफा बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरु लागले आहेत. 25 जून म्हणजे आज 24 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 112 रुपयांनी घसरुन 97151 रुपयांवर आहेत.
2/5
चांदीच्या दरात देखील घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 317 रुपयांची घसरण होऊन ते 105650 रुपये प्रति किलोवर आली आहे. जीएसटी आणि मेकिंग चार्जसह सोन्याचे दर 100065 रुपये एक तोळा आणि चांदीचा दर 108819 रुपये किलो आहे.
3/5
आयबीजेएच्या दरानुसार 23 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 112 रुपयांनी घसरुन 96762 रुपयांवर आले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 103 रुपयांनी घसरुन 89990 रुपये झाले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 72863 रुपये आहेत. हे दर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस शिवाय आहेत.
4/5
सोने आणि चांदीचे हे दर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेले आहेत. हे दर जीएसटीशिवाय असून यामध्ये मेकिंग चार्जेसचा देखील समावेश नाही. वरीलदरांपेक्षा प्रत्यक्ष बाजारात सोनं 1000 ते 20000 महाग असेल.
5/5
2025 मध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 21411 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर 19633 रुपयांनी वाढले आहेत. 31 डिसेंबरला सोन्याचे दर 76045 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर, चांदीचे दर 85680 रुपये इतके होते.
Sponsored Links by Taboola